शिडवणे नं. १ शाळेमध्ये श्रावण मासातील नागपंचमी सणानिमित्त नागपंचमी निबंध स्पर्धा, नागशिल्प स्पर्धा व नागचित्र स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच सापांची माहिती संकलित करणाऱ्या ५ मुलांना मा. प्रशांत वाघरेसाहेब ( दुर्गवीर प्रतिष्ठान सदस्य ) यांच्या देणगीतून भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. निबंध, चित्र आणि शिल्प स्पर्धेसाठी कै. अशितोष तुकाराम कुबल यांच्या स्मरणार्थ भेटवस्तूंचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले.
त्यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती मा. रविंद्रजी जठार , शिडवणे सरपंच मा. रविंद्रजी शेट्ये, राष्ट्रपती पोलीस पुरस्कारप्राप्त निवृत्त पोलीस उपनिरीक्षक मा. विजयजी टक्के, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया पाष्टे, सुप्रिया पांचाळ, स्मिता टक्के, शांताराम धुमाळ, तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्रजी टक्के, पोलिसपाटील मा. समीर कुडतरकर, शिक्षणतज्ज्ञ मा. मनोहर कोकाटे, बाबा टक्के, तारीफ शेख, अन्वी येतकर, संचिता टक्के, मनाली धुमाळ, ग्रामसेवक नलावडे या मान्यवरांच्या शुभहस्ते यशस्वी मुलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. शिडवणे नं. १ शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. गावातील बहुसंख्य पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी व प्रतिष्ठित नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते.























No comments:
Post a Comment