Thursday, August 15, 2024

सुंदर व सुबक राखी तयार करणे : स्पर्धा

 19 ऑगस्ट रोजी ' रक्षाबंधन ' आहे. त्यानिमित्ताने शाळेतील सर्व मुलांसाठी ' सुंदर व सुबक राखी बनविणे ' स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. 

१ ली व २ री : लहान गट : परीक्षक : श्री. काळेलसर 

3 री ते ५ वी : मध्यम गट : परीक्षक : सौ. वरुणकरमॅडम 

६ वी ते ७ वी : मोठा गट : श्रीम. वंजारीमॅडम 

वरील तीन गटांमध्ये स्पर्धेचे आयोजन केलेले असून ज्या मुलांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नावे आपल्या वर्गशिक्षकांकडे दिनांक १६ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या दोन दिवसात द्यायची आहेत. याच राख्यांचा उपयोग प्रत्यक्ष रक्षाबंधनासाठी केला जाणार आहे. तरी सर्वांनी आकर्षक, सुबक आकाराच्या राख्या बनवून आणाव्यात. दिनांक २० ऑगस्ट रोजी मंगळवारी शालेय वेळेत ' रक्षाबंधन ' उपक्रम घेण्यात येईल. सर्व मुलांचे मुली औक्षण करतील. त्यावेळी मुलगे मुलींसाठी काहीतरी खाऊ देतील. खाऊ म्हणजे एखादे चॉकलेट किंवा लाडू देऊ शकतात. प्रत्येक भावाने आपल्याला राखी बांधणाऱ्या बहिणीसाठी स्वतःहून उत्स्फूर्तपणे खाऊ आणावे. कोणालाही त्याबद्दल सक्ती नाही. शाळेकडून सर्व मुलांना खाऊ दिले जाणारच आहे. त्यादिवशी माता पालक संघातील माता पालकांनी उपस्थित राहण्यासाठी नम्र विनंती करीत आहोत. धन्यवाद. 

©️ मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १

No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...