Monday, August 12, 2024

🛑 माऊली वारकरी संप्रदाय मंडळ शिडवणे यांच्या वतीने वह्या वाटप

 🛑 माऊली वारकरी संप्रदाय मंडळ शिडवणे यांच्या वतीने वह्या वाटप 

🔸 मातोश्री सीताबाई सोशल फाउंडेशन पुणे यांचे सहाय्य 

शिडवणे : 

          १२ ऑगस्ट रोजी माऊली वारकरी संप्रदाय मंडळ, शिडवणे व मातोश्री सीताबाई सोशल फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिडवणे नं. १ शाळेतील सर्व मुलांना वह्यांचे समारंभपूर्वक वाटप करण्यात आले. 

         त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्व उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व मुलांना वह्यांचे वितरण करण्यात आले. मातोश्री संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत हरियाण म्हणाले, " मुलांनो, आमच्या आणि माऊली वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने वह्या वाटप करताना अतिशय आनंद होतो आहे. तुम्ही खूप शिका आणि आपल्या शाळेचे, गावाचे नाव सर्वदूर पोहोचवा. " संस्थेच्या देणगीबद्दल शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये यांनी देणगीदारांचे शाळेच्या आणि गावाच्या वतीने आभार मानले.

           त्यावेळी शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये, उपसरपंच दिपक पाटणकर, शिडवणे तंटामुक्ती अध्यक्ष व माऊलीचे कार्याध्यक्ष महेंद्र टक्के, देणगीदार यशवंत हरियाण, सुरेश शेंगाळे, विजय शेट्ये, सीताराम टक्के,मंगेश सुतार, विठोबा पाष्टे, सखाराम पाटणकर, रविंद्र पांचाळ, बाळकृष्ण सुतार, जयराम गिरकर, उर्मिला सुतार, स्नेहा पांचाळ, सायली सुतार, श्रीपत धुमाळ, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा समिता सुतार, सीमा वरुणकर, दिपक काळेल, हेमा वंजारी आणि शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक कुबल यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.







































No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...