🛑 रानडे कुटुंबियांकडून मिळालेल्या आर्थिक भेटीतून...
मा. शरयु रानडे मॅडम आणि मा. ऋषिकेश रानडे साहेब यांनी नुकतीच आपल्या शाळेला आकस्मिक सदिच्छा भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी शाळेसाठी शैक्षणिक उठाव रक्कम दिली होती.
आपल्या शाळेमध्ये यंदा स्काऊट चळवळीची चार पथके स्थापन करण्यात आली आहेत. कब, बुलबुल हे अनुक्रमे पहिली ते चौथीच्या मुलांसाठी, मुलींसाठी असते. तसेच स्काऊट व गाईड हे अनुक्रमे ६ वी, ७ वी च्या मुलांसाठी, मुलींसाठी असते. या सर्व पथकांची शासनाकडे फी भरुन रीतसर नोंदणी करावी लागते. कालच आपण ही रीतसर नोंदणी केली आहे. त्यासाठी एकूण १०६८ रुपये खर्च आला आहे. हा सर्व खर्च मा. रानडे कुटुंबियांच्या जमा निधी मधून करण्यात आला आहे. त्यासाठी मुलांकडून कोणतीही रक्कम घेण्यात आलेली नाही.
रानडे कुटुंबियांना शाळेच्या, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ व पदाधिकारी यांच्या वतीने धन्यवाद देत आहोत.
©️ मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १


No comments:
Post a Comment