माझी ई - शाळा अंतर्गत आमच्या शिडवणे नं. १ शाळेची निवड झाली असून त्याचे प्रशिक्षण सोमवार दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात आले. त्यावेळी शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक प्रवीण कुबल प्रशिक्षणाला उपस्थित होते.
शाळेतील सर्व शिक्षकांना सदर प्रशिक्षणाबाबत कल्पना दिली असून प्रथम इन्फोटेक च्या DS Teacher app चा वापर करुन जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सदर प्रशिक्षण ऑनलाईन पूर्ण करु शकतात. तसेच Digital Sakshar नावाचे app प्ले स्टोअर वर उपलब्ध असून त्याचाही वापर सर्व शिक्षक आपल्या दैनंदिन अध्यापनात करु शकतात.
माझी ई शाळा अंतर्गत आमच्या शाळेला एक पेन ड्राईव्ह प्राप्त झाला आहे. तसेच तिसरी इयत्ता वगळून सर्व इयत्तांची प्रश्नपेढी प्राप्त झालेली आहे.
आमच्या शाळेला माझी ई - शाळा प्रकल्पात घेतल्याबद्दल आम्ही शाळेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करीत आहोत.






No comments:
Post a Comment