🛑 आनंददायी शनिवार दहावा शनिवार
ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते या सुंदर प्रार्थनेने आजच्या आनंददायी शनिवारची सुरुवात झाली. त्यानंतर खालील उपक्रम वैयक्तिक व सामूहिक रूपात घेण्यात आले.
१ ) प्राणायाम पूर्वतयारी : यामध्ये पुरक, कुंभक आणि रेचक याविषयी कुबल सरांनी मार्गदर्शन केले.
२ ) चला आदर करूया : या सदरामध्ये सीमा वरुणकर मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन त्यांनी आदर कसा करावा हे स्पष्ट केले.
३ ) सिग्नलदादा : या विषयासंदर्भात पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी मॅडम यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यांनी सुद्धा लाल पिवळा आणि हिरवा या रंगांविषयी अधिक माहिती दिली.
४ ) मनोरंजक खेळ : बाहेर पाऊस पडत असल्यामुळे वर्गातल्या वर्गात मनोरंजक खेळ घेण्यात आले. त्यामध्ये स्टॅंड अप - सीट डाऊन आणि राम सीता हे गेम घेण्यात आले. हे गेम सर्व मुलांना खूप आवडले.
५ ) कागदाची टोपी : कार्यानुभवच्या तासिकेमध्ये प्रत्येक वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. प्रवीण कुबल सर यांनी जुन्या वर्तमानपत्राची टोपी बनवायला शिकवली. सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर ज्यानी टोप्या बनवल्या होता त्यांनी टोप्या डोक्यात घालून फोटोसेशन केले. टोप्या घातलेली मुले खूप सुंदर दिसत होती. मुलांच्या चेहऱ्यावर प्रसन्न आनंद दिसत होता.
६ ) परसबागेची काळजी : दिपक काळेल सर यांनी शाळेतील परसबागेची निगा कशी करायची या संदर्भात अतिशय तपशीलवार माहिती सांगितली. पालेभाजी पिकवताना कोणती काळजी घ्यावी या संदर्भातही त्यांनी उदाहरणासह स्पष्टीकरण केले.
७ ) जुन्या वर्तमानपत्रातून अध्ययन : सर्व मुलांना सर्व शिक्षकांनी जुन्या वर्तमानपत्रांची उपलब्धता करून दिली. सर्व मुलांनी जुन्या वर्तमानपत्रातील मोठ्या ठळक अक्षरातील बातम्या वाचून दाखवल्या. वाचन केलेल्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
८ ) कविता वाचू व कविता करू : कुबलसरांनी यमक जुळणारी एक कविता म्हणून दाखवली. ‘ चला रे आराध्यानो आपण जाऊ जोगव्याला ‘ ही कविता अभिनय रूपात घेण्यात आली. मुलांना ती खूप आवडली. सर्व मुलांना ती घरी गेल्यानंतर लिहिण्यासाठी गृहकार्य देण्यात आले.
९ ) सूर्यनमस्कार : योगशिक्षक प्रवीण कुबलसरांनी सर्व मुलांना सूर्यनमस्काराविषयी अधिक माहिती दिली. त्यातील बारा सूर्यनमस्कार मंत्र सांगितले.
१० ) आनंदाची शाळा : घरी जाता जाता मुलांनी एखादं गाणं म्हणत जावे यासाठी ‘ आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा ‘ हे गीत मुलांना शिकविण्यात आले. या गाण्यांच्या तालावर मुलांसोबत शिक्षकांनीही नृत्य केले.
११ ) पानांपासून सौदर्याकृती : इयत्ता सहावी आणि सातवीच्या मुलांनी विविध पानांपासून अप्रतिम चित्राकृती निर्माण केल्या. या चित्र तासिकेसाठी मा. पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन केले.
🌀 मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १




































No comments:
Post a Comment