Friday, August 16, 2024

मा. रानडे कुटुंबियांची शिडवणे नं. १ शाळेला सदिच्छा भेट

          आज आमच्या शिडवणे नं. १ शाळेत मा. शरयु रानडे मॅडम व मा. ऋषिकेश रानडे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी शाळेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. कै. विश्वनाथ रघुनाथ रानडे गुरुजी यांच्या आठवणी जागृत करत त्यांचे नातू मा. ऋषिकेश रानडे यांनी सर्व मुलांना अनमोल मार्गदर्शन केले. मा. शरयु रानडे मॅडम यांनी मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांचेकडे आर्थिक देणगी प्रदान केली. त्यावेळी शिडवणे गावठणवाडीचे वाडीप्रमुख मा. सदाशिव कुडतरकरसाहेब उपस्थित होते. 

          शिडवणे नं. १ शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, शिक्षकवृंद, मुख्याध्यापक आणि समस्त पालक यांच्या वतीने रानडे कुटुंबियांचे आभार व्यक्त करीत आहोत. 










No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...