Thursday, August 15, 2024

आभार, आभार, आभार

 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाला शिडवणे गावातील सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शिक्षक पालक संघ पदाधिकारी, माता पालक संघ पदाधिकारी, गावातील तमाम ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ श्रेष्ठ शिक्षणप्रेमी नागरिक, देणगीदार, पालकवर्ग, अधिकारी, निवृत्त अधिकारी, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे अध्यक्ष, कार्यकर्ते, अंगणवाडी कर्मचारी, शिक्षकवृंद आणि देशावर निरतिशय प्रेम करणारे बहुसंख्य देशवासीय उपस्थित राहिले होते. त्याबद्दल शाळेच्या वतीने सर्वांचे आभार मानीत आहोत. 

          तसेच प्रतिवर्षाप्रमाणे डॉ. संजयजी कोकाटे साहेब यांच्या वतीने सर्वांना जिलेबी देऊन तोंड गोड करण्यात आले. ग्रामपंचायत शिडवणे यांजकडून सर्वांना कॅडबरी देण्यात आली. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीनेही मुलांना शेंगदाणा लाडू प्राप्त झाले. शिडवणे नं. १ शाळेच्या वतीने सर्वांना पारंपारिक पद्धतीने लेमनच्या गोळ्या वाटण्यात आल्या. सर्वांनी केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल पुन्हा एकदा शाळेच्या वतीने  आभार व्यक्त करीत आहोत. तसेच 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मा. प्रशांतजी वाघरेसाहेब व मा. ईश्वरी प्रवीण कुबल यांनी मुलांसाठी दिलेल्या वस्तुरूप बक्षीसांबद्दल शाळेच्या वतीने आभार व्यक्त करीत आहोत. 

©️ मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १

          

No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...