Saturday, July 19, 2025

🔴 शिडवणे नं. १ शाळेत 'ज्ञानकुंज' मासिकाचे दिमाखदार अनावरण; मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांच्या संकल्पनेतून साकारला अभिनव उपक्रम!



🔴 शिडवणे नं. १ शाळेत 'ज्ञानकुंज' मासिकाचे दिमाखदार अनावरण; मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांच्या संकल्पनेतून साकारला अभिनव उपक्रम!

शिडवणे, 19 जुलै 2025: शिडवणे नं. १ शाळेतील विविध शैक्षणिक घडामोडी आणि उपक्रमांना एक कायमस्वरूपी व्यासपीठ मिळावे, या उदात्त हेतूने शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'ज्ञानकुंज' या शालेय मासिकाचे आज पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या शुभहस्ते दिमाखदार अनावरण करण्यात आले.
          शाळेत नेहमीच विविध अभिनव उपक्रम राबवले जातात आणि त्यांच्या बातम्या संकेतस्थळावर तसेच युट्यूब चॅनेलवर नियमितपणे अपलोड केल्या जातात. मात्र, या सर्व शैक्षणिक कार्याचे एकत्रित आणि संग्राह्य स्वरूप असावे, ही मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांची कल्पना होती. त्यांच्या या दूरदृष्टीला सर्व शिक्षक वृंदांनी सक्रिय सहकार्य दिले आणि त्यातूनच 'ज्ञानकुंज' हे मासिक अस्तित्वात आले.
          'ज्ञानकुंज'च्या जून 2025 च्या पहिल्या अंकामध्ये प्रामुख्याने शालेय आणि सहशालेय उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. यापुढे दर महिन्याला शाळेत राबवले जाणारे सर्व उपक्रम लेख स्वरूपात या मासिकात प्रकाशित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेला किंवा त्या आठवड्यात मान्यवरांच्या शुभहस्ते नवीन अंकाचे प्रकाशन करण्यात येणार असून, हे मासिक डिजिटल स्वरूपामध्ये सर्वदूर पोहोचवले जाणार आहे, ज्यामुळे अधिकाधिक पालकांना आणि समाजाला शाळेच्या प्रगतीची माहिती मिळेल.
          या महत्त्वपूर्ण अनावरण सोहळ्याला जिल्हा परिषद पदाधिकारी माजी वित्त आणि बांधकाम सभापती रवींद्रजी जठार साहेब, शिडवणे सरपंच रवींद्रजी शेट्ये साहेब, कणकवली पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी किशोर गवस साहेब, केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल साहेब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुप्रिया पाष्टे, ग्रामपंचायत सदस्य स्मिता टक्के, पोलीस पाटील समीर कुडतरकर, माजी अध्यक्ष दिनेश रांबाडे, उपाध्यक्ष संचिता टक्के, माजी सदस्या मंजुळा गुंडये, असलदे तावडेवाडीचे उपशिक्षक जंगले सर, तसेच गायत्री वाघरे, उर्मिला सुतार, अन्वी येतकर, मनाली धुमाळ, तारीफ शेख, अरविंद धाक्रस, रेशमी भोवड, गणेश पाष्टे, मंगेश सुतार, जान्हवी टक्के, मानसी रांबाडे, योगेश शिंदे, अर्चना पाष्टे, निशा कुडतरकर, सत्यवती वारीसे, प्रेरणा कासार्डेकर, स्नेहा पांचाळ, अर्चना भोवड, अनिल गुंडये, स्मिता पाष्टे, प्रवीण पाटणकर, सायली सुतार, नदीम शेख, शब्बीर शेख, कोमल वारीसे इत्यादी पदाधिकारी, अधिकारी, पालक वर्ग, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          या शैक्षणिक मासिकाबद्दल सर्व उपस्थित पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या शब्दात कौतुक केले. 'ज्ञानकुंज' हे मासिक शाळेच्या प्र्यागतीत एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, ते विद्यार्थी आणि पालकांसाठी माहितीचा एक उत्तम स्रोत बनेल अशी आशा व्यक्त करण्यात आली.




 

No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...