Monday, July 28, 2025

🔴 शिडवणे नं. १ शाळेत नागपंचमी निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न!

🔴 शिडवणे नं. १ शाळेत नागपंचमी निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न!

शिडवणे नं. १, २८ जुलै २०२५: आज श्रावण सोमवार, नागपंचमीच्या आदल्या दिवशी शिडवणे नं. १ शाळेत 'नागपंचमी' या विषयावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाचवी, सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

मुलांनी अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण निबंध सादर केले. या निबंधांमधून सर्वोत्तम तीन निबंधांची निवड करण्यात आली. यात सर्वोत्तम निबंधाचे पारितोषिक सातवीच्या फरीन तारीफ शेख हिने पटकावले. पाचवीच्या शुभ्रा सुनील पांचाळ हिचा निबंध उत्तम ठरला, तर श्रेयांश सुनील पांचाळ याला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक पारितोषिके देऊन गौरवण्यात येईल. या निबंध स्पर्धेचे परीक्षण हेमा वंजारी, सुरेंद्र यादव आणि सीमा वरुणकर यांनी केले.

क्रमांक प्राप्त केलेल्या सर्व पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेने कौतुक केले आहे.








No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...