Saturday, July 19, 2025

🔴 शिडवणे नं. १ शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन, दिनेश रांबाडे नवे अध्यक्ष!

🔴 शिडवणे नं. १ शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन, दिनेश रांबाडे नवे अध्यक्ष!

शिडवणे, 19 जुलै 2025: शिडवणे नं. १ शाळेत नुकतीच शालेय व्यवस्थापन समिती पुनर्गठन सभा आणि सर्वसाधारण पालक सभा उत्साहात पार पडली. या सभेत दिनेश रांबाडे यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

          यावेळी मावळत्या अध्यक्षा सुप्रिया पाष्टे आणि मावळत्या सदस्या मंजुळा गुंडये यांचे शाळेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानण्यात आले. तसेच, नवीन शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीसाठी पालक प्रतिनिधी म्हणून गायत्री गोविंद वाघरे यांचीही सर्वानुमते निवड करण्यात आली.

          या महत्त्वाच्या सभेला बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होता. त्यांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने नव्या समितीची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी माजी वित्त आणि बांधकाम सभापती रविंद्रजी जठार साहेब, शिडवणे सरपंच रवींद्रजी शेट्ये साहेब, कणकवली पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी किशोर गवस साहेब यांसारखे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

          याशिवाय, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुप्रिया पाष्टे, ग्रामपंचायत सदस्य स्मिता टक्के, पोलीस पाटील समीर कुडतरकर, माजी अध्यक्ष दिनेश रांबाडे, उपाध्यक्ष संचिता टक्के, गायत्री वाघरे, उर्मिला सुतार, अन्वी येतकर, मनाली धुमाळ, तारीफ शेख, अरविंद धाक्रस, रेशमी भोवड, गणेश पाष्टे, मंगेश सुतार, जान्हवी टक्के, मानसी रांबाडे, योगेश शिंदे, अर्चना पाष्टे, निशा कुडतरकर, सत्यवती वारीसे, प्रेरणा कासार्डेकर, स्नेहा पांचाळ, अर्चना भोवड, अनिल गुंडये, स्मिता पाष्टे, प्रवीण पाटणकर, सायली सुतार, नदीम शेख, शब्बीर शेख, कोमल वारीसे इत्यादी मान्यवर व पालक प्रामुख्याने उपस्थित होते.

          या पुनर्गठन सभेमुळे शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नव्या जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली असून, निवड झालेल्या नवीन समितीकडून शाळेच्या प्रगतीसाठी भरीव कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.












No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...