🔴 शिडवणे नं. १ शाळेत माजी केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल सरांचा सन्मान सोहळा संपन्न!
शिडवणे, 19 जुलै 2025: शिडवणे नं. १ शाळेला माजी शेर्पे केंद्रप्रमुख सन्माननीय सद्गुरु कुबल सर यांनी शैक्षणिक व प्रशासकीय भेटीसंदर्भात नुकतीच आकस्मिक भेट दिली. या अचानक भेटीचे औचित्य साधून शाळेच्या वतीने पदाधिकारी आणि उपस्थित मान्यवरांनी कुबल सरांचा सस्नेह सन्मान केला.
यावेळी शाळेच्या वतीने कुबल सरांना विठ्ठलाची सुंदर मूर्ती सप्रेम भेट देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कुबल सरांनी केंद्रप्रमुख म्हणून केलेल्या कामाची दखल घेऊन शाळेने हा सन्मान सोहळा आयोजित केला होता.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, माजी वित्त आणि बांधकाम सभापती रवींद्रजी जठार साहेब, शिडवणे सरपंच रवींद्रजी शेट्ये साहेब, कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस साहेब आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पालक वर्ग, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी वृंद उपस्थित होते.
कुबल सरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या या भेटीमुळे शाळेतील वातावरण अधिक चैतन्यमय झाले. कुबल सरांनीही शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा सन्मान सोहळा शाळेसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला.


No comments:
Post a Comment