शिडवणे नं. १ शाळेत मोफत छत्री वाटप समारंभ उत्साहात संपन्न!
कै. प्रवीणचंद्र शहा यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप; मान्यवरांची उपस्थिती
शिडवणे, ३० जुलै २०२५: शिडवणे गावठणवाडी उत्कर्ष मंडळ, शिडवणे यांच्या वतीने कै. प्रवीणचंद्र शहा यांच्या पवित्र स्मरणार्थ, त्यांच्या पत्नी हंसा प्रवीणचंद्र शहा व चिरंजीव मितेश प्रवीणचंद्र शहा यांच्या आर्थिक सहकार्याने शिडवणे नं. १ शाळेतील आणि अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभास विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते, ज्यांच्या हस्ते चिमुकल्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त निवृत्त पोलीस अधिकारी विजय टक्के, शिडवणे गावठणवाडी उत्कर्ष मंडळाचे वाडीप्रमुख सदाशिव कुडतरकर, मुंबईस्थित सदस्य मंगेश शेट्ये व विजय शेट्ये, ग्रामपंचायत सदस्य दयानंद कुडतरकर व संतोष टक्के, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रांबाडे व उपाध्यक्षा संचिता टक्के, शिडवणे आरोग्य मंदिर अधिकारी प्रणव पाटील, तसेच आरोग्य सेवक गणेश तेली, अरविंद धाक्रस, उर्मिला सुतार, सायली सुतार, जान्हवी टक्के, निशा कुडतरकर, प्रेरणा कासार्डेकर, तारीफ शेख, समीक्षा सुतार, वैभव पाटणकर, विराज शेट्ये हे उपस्थित होते.
याशिवाय, अंगणवाडी सेविका प्रियांका पाटणकर, मदतनीस कविता केतकर, शालेय पोषण आहार स्वयंपाकी समिता सुतार, शिडवणे कोनेवाडी अंगणवाडी सेविका शालिनी शिर्सेकर, समाधान पाटणकर, कृषीदूत राहुल पळसकर, निशांत माने, तेजस येडगे, पृथ्वीराज नरके, अभंग सलगर, दिग्विजय संकपाळ, दिग्विजय जांभळकर, हृतेश यादव यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल, उपमुख्याध्यापिका सीमा वरुणकर, पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी आणि क्रीडा शिक्षक सुरेंद्र यादव यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व मुलांना छत्र्यांचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना, शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी शिडवणे गावठणवाडी उत्कर्ष मंडळाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी केलेल्या विविध उपक्रमांबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. मंडळाच्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत येताना मोठा दिलासा मिळणार असून, शैक्षणिक उपस्थिती वाढण्यासही मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.













No comments:
Post a Comment