Friday, August 16, 2019

शिडवणे नं. १ शाळेची संरक्षक भिंत कोसळली

शिडवणे  : दिनांक : १६ ऑगस्ट : यंदा पडलेल्या मुसळधार व पूर आणणाऱ्या पावसाचा फटका शिडवणे  नं. १ शाळेलाही बसला आहे. शाळेच्या भोवती असणारी संरक्षक भिंत अचानक कोसळल्याने शाळेचे बरेच नुकसान झाले आहे. शाळेच्या इमारतीच्या मागील बाजूचा बांधलेला गडगा पावसामुळे जीर्ण झाला आहे. पावसाच्या सततच्या माऱ्यामुळे तो ढासळला असून सुमारे २० ते ३० फुटांची संरक्षक भिंत कोसळून यापुढे अधिक कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळेचे झालेले नुकसान भरून येण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा व मजबूत संरक्षक भिंत बांधण्यासाठी मंजुरी मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...