शिडवणे नं.१ शाळेत वृक्षारोपण केले खारेपाटण कॉलेजच्या NSS च्या छात्रांनी
शिडवणे : दिनांक - १ ऑगस्ट २०१९ : आज रोजी ग्रामपंचायत शिडवणे यांच्या सहकार्याने खारेपाटण कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शिडवणे शाळा नंबर १ च्या आवारामध्ये सागाची झाडे लावून शाळेतील मुलांना झाडे लावण्याचे धडे दिले.त्यावेळी ग्रामपंचायतचे उमेश मेस्त्री, प्राध्यापक श्री. वसीम सय्यद , विदयार्थी प्रतिनिधी दशरथ इंगळे,प्रथमेश नारकर,विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रणाली पांचाळ, दिक्षीता बांदिवडेकर , विद्यार्थी समन्वयक प्रथमेश राणे आणि राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील सर्व विद्यार्थी होते.
शिडवणे शाळेचे मुख्याध्यापक सुनिल तांबे, प्रवीण कुबल , सीमा वरुणकर , सुजाता कुडतरकर इत्यादी शिक्षकवृंद त्यावेळी उपस्थित होते. शाळेतील मुलांनी योग्य मदत केली. त्यांनी आतापर्यंत पोंबुर्ले , चिंचवली , नडगिवे या गावांमध्ये जाऊन एकूण ७५० पेक्षा जास्त झाडे लावून पर्यावरणाला मदतच केली आहे. साग, शिवण,काजू, गुलमोहर इत्यादी झाडे लावून सर्वांना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सुरु असलेल्या त्यांच्या पर्यावरण पूरक उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी मानले.






No comments:
Post a Comment