Thursday, August 1, 2019

शिडवणे नं. १ शाळेत वक्तृत्व स्पर्धा संपन्न

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती

शिडवणे : दिनांक १ ऑगस्ट २०१९ : शिडवणे  नं .१ शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शाळेतील १ ली ते ७ वीच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी भाषणे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्यन चव्हाण या सांस्कृतिक मंत्र्याने केले. अध्यक्ष म्हणून शाळेचा मुख्यमंत्री सुयश शेट्ये याने अध्यक्षीय भाषण उत्तम रितीने केले.
                सर्व मुलांनी सभाधीटपणा दाखवला. टिळकांबद्दल बोलताना मुलांनी त्यांचे चरित्र उलगडून सांगितले. २ ते ३ मिनिटांचे भाषण करताना मुले अगदी तयारीने आलेली होती. सर्वप्रथम टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. बालसभेचे आयोजन शालेय स्वराज्य मंडळाने केले होते. १ ली व २ री चा लहान गट, ३ री व ४ थी  चा मध्यम गट व ५ वी  ते ७ वी चा मोठा गट अशा प्रकारे गटनिहाय परिक्षण करण्यात आले. परीक्षक म्हणून सीमा वरुणकर  व सुजाता कुडतरकर यांनी काम पाहिले . मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी मुलांना भाषण करताना लक्षात घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या. केतन पाटणकर या विद्यार्थ्याने सर्वांचे मनापासून आभार मानले.




























               


No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...