स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून अधिकारी बना : रविंद्र शेट्ये यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
शिडवणे : दिनांक १ ऑगस्ट २०१९ : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अतुल रावराणे , संदेश पारकर आणि रविंद्र शेट्ये यांच्या सौजन्याने शिडवणे नं. १ शाळेत मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावरून बोलताना रविंद्र शेट्ये म्हणाले कि, मुलांनी आपल्या आई- वडिलांना विसरू नये, शिक्षकांनी शिकवल्याप्रमाणे पुढील आयुष्यात अधिक शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा, त्यात यश संपादन करून अधिकारी बनावे, आपल्या जिल्ह्यात अधिकारी म्हणून काम करावे व आपल्या गावाचे, जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे .
रविंद्र शेट्ये यांच्या सौजन्याने अंगणवाडीच्या सर्व मुलांना अंकलिपी व खाऊचे वाटप करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर सुधीर कुबल, भाऊ राणे, रविंद्र शेट्ये, प्रकाश पाटणकर,सुनिल शेट्ये, मनोहर टक्के, दिपक पांचाळ , निलेश टक्के, महेश टक्के, उमेश ढेकणे, राजू वरुणकर, अनिता कुडतरकर, वामन वारीसे ,प्रतिष्ठित ग्रामस्थ, शिक्षकवृंद व विद्यार्थीवर्ग इत्यादी उपस्थित होते. त्याबद्दल शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी देणगीदारांचे हार्दिक आभार मानले.

No comments:
Post a Comment