Friday, August 16, 2019

शिडवणे नं. १ शाळेत रक्षाबंधन व वृक्षाबंधन उपक्रम

शिडवणे दिनांक - १६ ऑगस्ट : रक्षाबंधन कार्यक्रमाचे औचित्य साधून शिडवणे  नं. १ शाळेत मुलींनी शाळेतील सर्व मुलांना रक्षाबंधन करून राखीपौर्णिमा साजरी केली. सर्व मुलींना शाळेतील सहाय्यक शिक्षिका सीमा वरुणकर व सुजाता कुडतरकर यांनी राख्या बनवणे कार्यशाळा घेऊन लोकरीपासून राख्या बनवण्याचे प्रात्यक्षिक घेतले. सर्व मुलींनी त्यात उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. उत्तम प्रतीच्या राख्या बनवून मुलींनी प्रसंगोपात सोपे उपक्रम , उत्पादक उपक्रम या कार्यानुभवाचा आनंद घेतला. शाळेत सर्वधर्मसमभाव या मूल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
          दरवर्षी या दिवशी शाळेत रक्षाबंधन आवर्जून साजरे केले जाते. शिक्षणप्रेमी ग्रामस्थ शिवराम जाधव यांनी या उपक्रमासाठी लागणारे आर्थिक सहकार्य दिले. मुलांनी व शिक्षकवृंदांनी त्यांचे आभार मानले. गांगेश्वर स्काऊट पथकाच्या १४ मुलांनीही एका झाडाला राखी बांधून आपले झाडांप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. शालेय पोषण आहार ताई गोसावी यांनी मुलांना गोड शिरा करून दिला.

No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...