Thursday, August 15, 2019

१५ ऑगस्ट - स्वातंत्र्यदिन - २०१९

          राष्ट्रीय उत्सव - १५ ऑगस्ट - स्वातंत्र्यदिन

  शिडवणे दिनांक : १५ ऑगस्ट २०१९ :
          आपला राष्ट्रीय उत्सव १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन शिडवणे नं.१ शाळेत अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला. त्यावेळी शाळेचे पदाधिकारी , लोकप्रतिनिधी , शिक्षकवृंद , ग्रामस्थ, पालक व सर्व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित  होते. शिडवणे गावातील रहिवासी असलेले राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त वरिष्ठ  पोलीस अधिकारी विजय  टक्के यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. त्यावेळी जिल्हा  सदस्य रविंद्र  जठार , शाळा  व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रांबाडे , प्रतिष्ठित शिक्षणप्रेमी देणगीदार यांनी कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
          ध्वजारोहणानंतर मुलांनी देशभक्तीपर गाणी  म्हटली. देशभक्तीपर घोषणा दिल्या. सर्वांना खाऊचे वाटप  करण्यात आले.  शिडवणे शाळेत नवीन स्काऊट पथकाची  सुरुवात करण्यात आली. स्काऊट पथकाच्या १४ विद्यार्थ्यांनी स्काऊटमध्ये प्रवेश केल्याबद्दल सर्व मुलांचा समारंभपूर्वक प्रवेश करण्यात आला. सर्व मुलांना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्काऊट प्रवेश बॅच शर्टावर लावण्यात आले . मुलांकडून स्काऊटमास्तर प्रवीण कुबल यांनी स्काऊटचे  नियम तयार करून घेतले. नियम समजावून सांगितले. स्काऊट स्कार्फ व ओगल देण्यात आले.
          क्रांतीदिनाचे औचित्य साधून सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाने घेतलेल्या स्पर्धेचे समारंभपूर्वक बक्षीस वितरण करण्यात आले. मोठा गट वक्तृत्व  स्पर्धा प्रथम - सुयश सुनिल शेट्ये , द्वितीय - सिद्धी निलेश टक्के , शाकीर शाहिद शेख, तृतीय - शुभम गंगाराम भोवड, तसेच मोठा गट निबंध स्पर्धा प्रथम - सिद्धी निलेश टक्के , द्वितीय -  सानिका सुधाकर वारिसे , तृतीय - अनुष्का दिनेश रांबाडे , तसेच लहान गट वक्तृत्व स्पर्धा प्रथम- जान्हवी दिनकर  गुंडये, द्वितीय -  पूनम संतोष गुंडये , तृतीय - विनोद मुकुंद राऊळ , लहान गट निबंध स्पर्धा प्रथम - पूनम संतोष  गुंडये, द्वितीय - दिव्या दिनेश रांबाडे ....सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सर्व बक्षिसप्राप्त मुलांचे अभिनंदन व कौतुक केले. पृथ्वीराज कोरे , राहुल गाठ या कृषी अभ्यासकांचे शाळेच्या वतीने  आभार मानण्यात आले.






























No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...