Saturday, August 10, 2019

आपण शेतकरी असल्याचा अभिमान बाळगा, शेतीमध्ये क्रांती घडवा - पृथ्वीराज कोरे

शिडवणे दिनांक : १० ऑगस्ट :
           सांगुळवाडी कृषी महाविद्यालय अंतर्गत शिडवणे नं . १ शाळेत क्रांती दिन विशेष वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन केलेले असताना कृषी पदविका शिकणाऱ्या पृथ्वीराज कोरे या विद्यार्थ्याने आपले परखड मनोगत व्यक्त केले. तेव्हा त्याने सांगितले कि, आपण शेतकऱ्यांची मुले आहोत याबद्दल तुम्हाला दुःख होता कामा नये, तुम्ही शेतकरी म्हणजे जगाचे पोशिंदे आहात , तुम्ही आहात , म्हणून जगातील मानव जिवंत आहेत, तुम्ही उत्पादन पिकवलेच नाही तर माणसे काय खातील ? याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्यांची मुले आहात ही  तुमच्यासाठी एक भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही शेतकरी असल्याचा अभिमान बाळगा, तसेच शेतीमध्ये अधिक क्रांती घडवून आणा. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी क्रांती घडवली तो हा दिवस आहे, तुम्ही आता शेतीमध्ये क्रांती घडवून आणा.
          निबंध स्पर्धेसाठी तीन विषय देण्यात आले होते. शालेय जीवनात शेतीचे महत्त्व , ९ ऑगस्ट - क्रांती दिन , शेतकऱ्याचे आत्मवृत्त तर वक्तृत्व स्पर्धेसाठीही तीन विषय देण्यात आले होते. मी शेतकरी बोलतोय, माझा आवडता  क्रांतिकारक , कृषी आणि क्रांती . कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल  तांबे, शालेय  मुख्यमंत्री  सुयश शेट्ये , परीक्षक सीमा वरुणकर , सुजाता कुडतरकर , कृषी अभ्यासक पृथ्वीराज कोरे, राहुल गाठ हे उपस्थित होते. सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी बजावण्याची आपापल्या परीने प्रयत्न केला. १ ते ५ हा लहान गट तसेच ६ ते ७ चा मोठा गट असे गट करण्यात आले होते. प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त मुलांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी समारंभपूर्वक पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे , असे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांगितले. कार्यक्रम उत्तम पार पाडल्याबद्दल शाळेचा विद्यार्थी केतन पाटणकर याने सर्वांचे हार्दिक आभार मानले.



          

No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...