🛑 शिडवणे नं. १ मध्ये योजनांचा जागर कार्यशाळा
🌀 चांगला स्पर्श, वाईट स्पर्श : उत्कर्षांना मार्गदर्शन
🌀 रस्ते व वाहतूक सुरक्षा मार्गदर्शन वर्ग संपन्न
शिडवणे :
शासनाच्या विविध शैक्षणिक योजना पालकांना माहिती होण्यासाठी शिडवणे नं. १ शाळेत ' योजनांचा जागर ' कार्यशाळा घेण्यात आली. त्यासोबत उत्कर्षांना ' चांगला स्पर्श व वाईट स्पर्श ' बाबत उदबोधन करण्यात आले. रस्ते व वाहतूक सुरक्षा अंतर्गत सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले.
मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. शाळेच्या वतीने गुलाबपुष्प देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण कुबल, हेमा वंजारी, सीमा वरुणकर आणि सुजाता कुडतरकर यांनी शैक्षणिक योजनांची सविस्तर माहिती दिली.
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त निवृत्त पोलीस अधिकारी विजय टक्के यांनी ' चांगला स्पर्श, वाईट स्पर्श ' आणि रस्ते वाहतूक सुरक्षा संदर्भात उदाहरणे देत मार्गदर्शन केले. सर्व मुलांना व्हिडीओ दाखवून विषय समजावून सांगितला.
शिडवणे उपसरपंच दिपक पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये, ग्रामपंचायत सदस्य शांताराम धुमाळ, सुप्रिया पाष्टे, सुप्रिया पांचाळ, स्मिता टक्के, तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र टक्के, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा समिता सुतार, तारीफ शेख, मंजुळा गुंडये, सचिन टक्के, श्रीपत धुमाळ, सदाशिव कुडतरकर, शिक्षक पालक संघ सदस्य, माता पालक सदस्य आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.















































































No comments:
Post a Comment