🛑 शिडवणे नं. १ शाळेत वृक्षारोपण संपन्न
🔸 औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे यांच्या विद्यमाने १७ वृक्षांचे रोपण
शिडवणे :
शिक्षण सप्ताह अंतर्गत शाळा शिडवणे नं.१ मध्ये औंदुबर सेवा ट्रस्ट नाधवडे यांच्या सौजन्याने शालेय परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व शारदामातेचे पूजन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या व शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. मान्यवराच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच रविंद्र शेट्ये, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ, उपाध्यक्षा समिता सुतार, ग्रामपंचायत सदस्य स्मिता टक्के, सुप्रिया पांचाळ, निवृत्त पोलीस अधिकारी विजय टक्के, शिक्षणतज्ज्ञ मनोहर कोकाटे, औदुंबर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर नारकर, रविंद्र खांडेकर, संतोष सावंत, प्रफुल्ल घाडी, परशुराम ईस्वलकर, रूपेश कुडतरकर, योगेश शेट्ये, राजेंद्र नारकर, दिपक पावसकर, रविंद्र गुंडये, अन्वी येतकर, प्रेरणा कासार्डेकर, दिपाली शेट्ये, मिनाक्षी नारकर, पुजा इस्वलकर, सदाशिव कुडतरकर, श्रीराम पाष्टे, तारीफ शेख, पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी इत्यादी उपस्थित होते. उपस्थित काही पदाधिकारी यांनी मनोगते व्यक्त केली.
सुजाता कुडतरकर यांनी प्रास्ताविक केले तर सीमा वरुणकर यांनी आभार मानले.
.























































No comments:
Post a Comment