Monday, July 1, 2024

🛑 शिडवणे नं. १ शाळेत कृषीदिन साजरा

🛑 शिडवणे नं. १ शाळेत कृषीदिन साजरा 

🔸पानांच्या विविध प्रकारांचे संकलन 

शिडवणे : 

दरवर्षी शिडवणे नं. १ शाळेमध्ये कृषी दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी आगळ्यावेगळ्या अनोख्या पद्धतीने तो साजरा करण्यात आला. 

        शाळेतील सर्व मुलांनी परिसरातील विविध प्रकारची पाने आणली होती. आंबा, काजू, चिकू, फणस, वड, पिंपळ, जास्वंद, सोनचाफा, गुलाब, मोगरा, सागवान, आवळा, चिंच, लिंबू , रामफळ,  सीताफळ,  अशोक, आकेशिया, मयूरपंख, तुळस, न्हिव, रक्तचंदन,  धूप, कापूर, सफरचंद, श्रीकृष्ण वड,  शेवगा,  पपई,  चवळी, पारिजातक,  अश्वगंधा, आपटा, मोरावळा, करवंद, कढीपत्ता, कडुलिंब,जांभूळ,डाळिंब,  शमी, लिंबू, रतांबा, बदाम इत्यादी सर्व प्रकारच्या पानांची माहिती मुलांनी घेतली. 

        साधे पान,  संयुक्त पान आणि पानांचे विविध प्रकार पाहताना व ऐकताना मुले त्यात रंगून गेली होती. खऱ्या अर्थाने कृषी दिन साजरा झाला. नवानियुक्त पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी यांनी उत्तम मार्गदर्शन केले. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल, उपशिक्षिका सुजाता कुडतरकर,  सीमा वरुणकर आणि शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष समिता सुतार उपस्थित होते.








No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...