🛑 शिडवणे गावठणवाडी उत्कर्ष मंडळ यांजकडून शिडवणे नं.1 शाळेतील एकूण मुलांना मुलींना मिळून 22 पांढरी शर्ट्स प्राप्त
शिडवणे गावठणवाडी उत्कर्ष मंडळ यांच्या वतीने दरवर्षी शाळेला विविध प्रकारची शैक्षणिक देणगी प्राप्त होत असते. आज आमच्या शाळेतील एकूण 22 मुलांना पांढऱ्या रंगाची सुती उत्तम शर्ट्स प्रदान करण्यात आली.
शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ आणि समस्त पालक वर्ग, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या वतीने शिडवणे गावठणवाडी उत्कर्ष मंडळ यांचे आभार मानीत आहोत.मा. मंगेशजी शेट्येसाहेब यांच्या प्रयत्नांसाठी त्यांचे विशेष आभार व्यक्त करीत आहोत.
▪️ मुख्याध्यापक, शिडवणे नं.1


No comments:
Post a Comment