Saturday, January 27, 2024

शिडवणे गावठणवाडी उत्कर्ष मंडळ यांचे आभार

🛑 देणगीदारांचे आभार

          मा. केवलचंदजी जैनसाहेब आणि मा. लिलावती जैनमॅडम यांच्या सौजन्याने व शिडवणे गावठणवाडी उत्कर्ष मंडळ यांच्या वतीने शिडवणे नं.1 शाळेसाठी हळदीकुंकू समारंभासाठी तीनशे भगिनींना आकर्षक स्वरूपाचे स्टिल ताट देण्यात आली.

          तसेच मा. प्रवीणजी शहासाहेब यांचे स्मरणार्थ मा. भारतीबेन प्रवीणजी शहा यांच्या सौजन्याने व शिडवणे गावठणवाडी उत्कर्ष मंडळ यांच्या वतीने शिडवणे नं.1 शाळेसाठी शालेय पोषण आहार अंतर्गत पन्नास पटसंख्या असलेल्या मुलांसाठी 50 स्टीलची ताटे, 50 बाऊल्स, 50 ग्लासे  देण्यात आली.  शाळेतील 50 विद्यार्थी व अंगणवाडीतील 20 विद्यार्थी अशा 70 विद्यार्थ्यांसाठी वॉटर बॅग देण्यात आली. 

              दिनांक 25 जानेवारी रोजी शिडवणे गावठणवाडी उत्कर्ष मंडळ यांनी प्रत्यक्ष येऊन शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रवीण कुबल यांजकडे 300 ताटे नग व हळदीकुंकू साठी लागणारे साहित्य सुपूर्द केले.

          त्यावेळी शिडवणे गावचे सरपंच माननीय रविंद्रजी शेट्येसाहेब, वाडी प्रमुख माननीय सदाशिवजी कुडतरकरसाहेब, हळदीकुंकसाठी गेली चार वर्षे सतत प्रयत्नशील असलेले माननीय मंगेशजी शेट्येसाहेब, सेक्रेटरी माननीय विजयजी कुडतरकरसाहेब, माजी सचिव विलासजी कुडतरकरसाहेब, सल्लागार माननीय सुभाष खानविलकरसाहेब आणि शाळेतील उपशिक्षिका, विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते.

          सदर साहित्य वितरण समारंभ व हळदीकुंकू समारंभ 26 जानेवारी 2024 रोजी शिडवणे नं.  1 शाळेमध्ये संपन्न करण्यात आला. 

          सर्व देणगीदार व शिडवणे गावठण उत्कर्ष मंडळ यांचे शिडवणे नं. 1 शाळा, ग्रामपंचायत शिडवणे, शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व समित्या यांच्या वतीने आभार मानण्यात आले.त्यावेळी मंडळाच्या वतीने शिक्षकांना भेटवस्तू देण्यात आली. 

▪️मुख्याध्यापक, शिडवणे नं.1















































No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...