🛑 शिडवणे नं.१ शाळेत वक्तृत्व स्पर्धा संपन्न
शिडवणे :
१ ऑगस्ट रोजी शिडवणे नं.१ शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित ' वक्तृत्व स्पर्धा ' घेण्यात आल्या.
त्यावेळी मुलांची बालसभा संपन्न झाली. मुख्याध्यापक सुनिल तांबे आणि शालेय स्वराज्य मंडळाच्या मुख्यमंत्री सेजल एकनाथ भोवड यांच्या शुभहस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल यांनी केले. स्पर्धेचे परिक्षण सुजाता कुडतरकर आणि सीमा वरूणकर यांनी केले.
वक्तृत्व स्पर्धेत सेजल एकनाथ भोवड हिचा प्रथम , श्रेया राजेश पाळेकर हिचा द्वितीय आणि तनिष्का प्रवीण पाटणकर हिचा तृतीय क्रमांक आला. वेदांत प्रल्हाद कुडतरकर आणि शुभ्रा सुनिल पांचाळ यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत गणवंती पाष्टे , सुशांत गुंडये , दुर्वा सुतार , केतन सुतार , गौरी खानविलकर , फरान शेख या मुलांनीही चांगले सादरीकरण केले.
प्रवीण कुबल यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित देशभक्तीपर गीतांचे गायन केले. मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी ' सभेत धीटपणे कसे बोलावे ' या विषयावर मार्गदर्शन केले व सर्वांचे आभार मानले.





No comments:
Post a Comment