Tuesday, August 16, 2022

🛑 जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून शिडवणे नं.१ शाळेला मोफत वह्यांचे वितरण

🛑 जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून शिडवणे नं.१ शाळेला मोफत वह्यांचे वितरण

🔵 जिल्हा परिषद सदस्य रविंद्र जठार आणि मान्यवरांच्या शुभहस्ते वह्यांचे समारंभपूर्वक वितरण 

शिडवणे : 

          जिजाऊ एक आधारवड संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे यांच्या आर्थिक सहकार्यातून शिडवणे नं.१ शाळेतील सर्व पन्नास मुलांना मान्यवरांच्या शुभहस्ते मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. 

          त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र जठार , शिडवणे सरपंच शीतल जाधव , रविंद्र शेट्ये , सुनिल शेट्ये , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश रांबाडे , खारेपाटण ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक दयानंद कोकाटे , माऊली वारकरी संप्रदाय मंडळाचे कार्याध्यक्ष महेंद्र टक्के , कोकाटे मॅडम , शिवराम जाधव , उमेश मेस्त्री , आरोग्य सेविका बारस्कर , आरोग्य सेवक तेली आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य , पालकवर्ग व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. 

          रविंद्र जठार म्हणाले , " शाळेतील मुलांना जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून मोफत वह्या मिळवण्यासाठी संदेश ( गोट्या ) सावंत यांच्या प्रयत्नातून शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळाला आहे. मुलांनी भरपूर अभ्यास करुन आपल्या शाळेचे , गावाचे नाव उंचवावे. " 

          या कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिडवणे गावचे सुपुत्र दयानंद कोकाटे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कुबल यांनी तर आभार मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी केले.

























No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...