🛑 टक्के उत्कर्ष मंडळ, शिडवणे यांजकडून शिडवणे नं.१ शाळेला २० खुर्च्यांची वस्तूरुप भेट
शिडवणे :
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी टक्के उत्कर्ष मंडळ , शिडवणे यांजकडून शिडवणे नं.१ शाळेला वीस प्लास्टिक खुर्च्यांची अनमोल अशी वस्तूरुप भेट समारंभपूर्वक देण्यात आली.
शिडवणे टक्के उत्कर्ष मंडळ हे टक्के बांधवांचा उत्कर्ष तसेच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी स्थापन झाले आहे. टक्के उत्कर्ष मंडळ, शिडवणे हे मंडळ स्थापन झाल्यापासून मंडळाने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला आहे. उच्च शिक्षितांचा तसेच विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या लहान थोर मंडळींना सन्मानचिन्ह देवून गौरव केला आहे. मंडळाने नेहमीच अध्यात्माची कास धरून समाज प्रबोधनाचे कार्य केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंडळाने शाळेला २० खुर्च्या शैक्षणिक देणगी स्वरुपात दिल्या आहेत.
त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष मनोहर टक्के , उपाध्यक्ष सदानंद टक्के , सचिव महेंद्र टक्के , सरपंच शीतल जाधव , उपसरपंच अनिल पांचाळ , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश रांबाडे , रामदास टक्के , रविंद्र शेट्ये , बाबा टक्के , बंडू कोकाटे , निलेश टक्के , समीर कुडतरकर , शीतल टक्के , संचिता टक्के , ललिता टक्के , आन्वी येतकर , शिवराम जाधव , श्याम भोवड , मनोहर कोकाटे , सुनिल शेट्ये , तारीफ शेख , रजनीकांत चव्हाण , सुप्रिया पाष्टे , कृष्णा केतकर आणि बहुसंख्य ग्रामपंचायत पदाधिकारी , शाळा व्यवस्थापन सदस्य , शिक्षक पालक सदस्य , माता पालक सदस्य , शिक्षणप्रेमी पालक , ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी टक्के उत्कर्ष मंडळ आणि राष्ट्रपतीपदक प्राप्त पोलीस अधिकारी विजय टक्के यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने विशेष आभार मानले.












No comments:
Post a Comment