Thursday, June 20, 2024

🛑 डेंग्यू चिकनगुनियाला आळा घालूया : आरोग्यसेवक गणेश तेली

 🛑 डेंग्यू चिकनगुनियाला आळा घालूया : आरोग्यसेवक गणेश तेली 

शिडवणे : 

          दरवर्षी पावसाळा सुरू झाला की डासांची उत्पत्ती वाढते. त्यासाठी सर्वत्र जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. शिडवणे उपकेंद्राच्या वतीने आरोग्य सेवक  गणेश तेली यांनी शिडवणे नं. 1 शाळेतील मुलांना ' पावसाळ्यात तुम्ही आणि मी काय करू शकतो? ' याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. 

          ते म्हणाले, " या दिवसात आपल्या घरातील पाण्याची भांडी व्यवस्थित झाकून ठेवली पाहिजेत. घरातील फुलदाण्यातील पाणी दिवसाआड बदलले पाहिजे. पाण्याच्या टाक्या व्यवस्थित झाकून ठेवल्या पाहिजेत. खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसवून घेतल्या पाहिजेत. घराभोवतीचा व शाळेभोवतीचा परिसर नेहमी स्वच्छ व कोरडा ठेवला पाहिजे. 

          हिवताप प्रतिरोध महिना असल्याने त्यांनी ' गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा ' याविषयी मार्गदर्शन केले. यासंदर्भात मुलांची प्रभात फेरी काढून मार्गदर्शक घोषणा दिल्या. 

           त्यावेळी शाळेतील उपशिक्षिका सुजाता कुडतरकर , सीमा वरुणकर, हेमा वंजारी, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष समिता सुतार आणि शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.








No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...