Saturday, June 15, 2024

🛑 शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम 2024

 🛑 शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम 2024


          शिडवणे नं. 1 शाळेतील आजचा प्रवेशोत्सव कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला. त्यावेळी वरील फोटोमधील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते शारदा माता व गणपतीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय धुमाळ साहेब यांच्या वतीने म्हणजेच शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

          ग्रामपंचायत शिडवणे सरपंच सन्माननीय रविंद्रजी शेटये साहेब यांच्या वतीने सर्व विद्यार्थी प्रतिनिधींचे, विद्यार्थिनी प्रतिनिधींचे, शिक्षक वृंदांचे स्वागत करण्यात आले. 

          सन्माननीय माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्रजी जठार साहेब, सन्माननीय  डॉक्टर संजय कोकाटे साहेब, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी सन्माननीय विजय टक्के साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांना पालकांना व शिक्षकांना शुभेच्छापर मार्गदर्शन केले. 

          मान्यवरांनी सर्व मुलांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले. सन्माननीय ललिता टक्के आजी व रामदास टक्के साहेब यांच्यावतीने सर्व मुलांना वह्या व लेखन साहित्य वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने पाठ्यपुस्तकांचा व भेटवस्तूंचा स्वीकार केला. नवीन पदवीधर शिक्षण सेविका हेमा वंजारी मॅडम यांनी आपला परिचय करून दिला. 

          दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई व पाष्टेवाडी मित्र मंडळ शिडवणे यांच्या वतीने शाळेला दोन लॅपटॉप वितरित करण्यात आले. त्यावेळी सन्माननीय  स्वरूपानंद पाष्टे साहेब  यांचे प्रातिनिधिक स्वरूपात धन्यवाद व्यक्त करण्यात आले. पाष्टेवाडी मित्र मंडळातील सर्व सदस्यांची नावे घेऊन त्यांचेही आभार मानण्यात आले. सन्माननीय प्रशांतजी वाघरेसाहेब यांचे विशेष आभार मानण्यात आले. 

          शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा पूर्व तयारी दुसरा मेळावा घेण्यात आला. त्यानिमित्ताने प्रभात फेरी, घोषवाक्ये यांचे आयोजन करण्यात आले होते. शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष समिता सुतार मॅडम, ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया पांचाळ मॅडम, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया पाष्टे मॅडम यांनी नवागतांचे औक्षण केले. 

          राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी सन्माननीय विजय टक्के साहेब यांनी फीत कापून शाळापूर्व तयारी मेळाव्याचे उद्घाटन केले. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. सर्वांनी गोड खिरीचा आस्वाद घेतला. 

          कार्यक्रमाच्या वेळी बहुसंख्य विद्यार्थी, पालक व पदाधिकारी उपस्थित होते.




























No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...