Friday, June 21, 2024

🛑 शिडवणे नं. 1 शाळेत योगा दिन साजरा

🛑 शिडवणे नं. 1 शाळेत योगा दिन साजरा

शिडवणे : 

          दरवर्षी 21 जून रोजी शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येतो. शिडवणे नं. 1 शाळेमध्ये 21 जून रोजी योग दिन साजरा करण्यात आला. 

          सकाळी आठ ते साडेआठ पर्यंत अर्ध्या तासाची तासिका घेण्यात आली. त्यावेळी योगप्रार्थना, प्राथमिक हालचाली, ताडासन, वृक्षासन, सुखासन, पद्मासन वज्रासन, अनुलोम विलोम, कपालभाती , प्राणायाम, शवासन इत्यादी आसनांची प्रात्यक्षिके घेण्यात आली. 

          त्यावेळी ग्रामपंचायत शिडवणेचे सरपंच रविंद्र शेट्ये यांनी सर्व मुलांसाठी परिपाठात बसण्यासाठी वैयक्तिक बैठका दिल्या. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ , उपाध्यक्षा समिता सुतार, उपशिक्षिका सुजाता कुडतरकर, सीमा वरुणकर, हेमा वंजारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन सर्व उपस्थित्यांचे आभार मानले.














































No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...