🛑 शिडवणे नं.१ शाळेत आंबेडकर जयंती निमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धा संपन्न
शिडवणे :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिडवणे नं.१ शाळेत निबंध स्पर्धेचे व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी बालसभा घेण्यात आली. डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन बालसभेला प्रारंभ झाला. १९ मुलांनी निबंध स्पर्धेत सहभाग घेतला. त्यात पुनम संतोष गुंडये प्रथम , सानिया संतोष सुतार द्वितीय आणि अमिषा गंगाराम जाधव तृतीय क्रमांकाने यशस्वी ठरल्या.
वक्तृत्व स्पर्धेत १९ मुलांनी भाषणे केली. बालसभेचे अध्यक्षस्थान सातवीची विद्यार्थिनी भक्ती दिपक भोवड हिने भूषविले. त्यावेळी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत अथर्व समीर कुडतरकर , जान्हवी दिनकर गुंडये , दिव्या दिनेश रांबाडे , प्रज्योत दिनकर गुंडये आणि वेदांत प्रल्हाद कुडतरकर यांनी अनुक्रमे क्रमांक प्राप्त केले.
शाळेच्या उपशिक्षिका सुजाता कुडतरकर आणि सीमा वरूणकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनमोल विचार मांडले.




No comments:
Post a Comment