Sunday, April 24, 2022

🛑 शाळा पूर्व तयारी अभियान उपक्रम स्तुत्य : रविंद्र जठारसाहेब

🛑 शाळा पूर्व तयारी अभियान उपक्रम स्तुत्य : रविंद्र जठारसाहेब

🟢 शिडवणे नं. १ शाळेत संपन्न झाला पहिला मेळावा

शिडवणे : 

         '  स्टार प्रकल्पांतर्गत '  शाळेत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी ' दोन शाळा पूर्व तयारी मेळावे घेण्याबाबत नियोजन केले जात आहे. त्यानुसार शिडवणे नं. १ शाळेने केलेले नियोजन व कार्यवाही स्तुत्य असून ' बालक पालक मेळावा ' उत्तमरीतीने संपन्न झाला आहे , असे प्रतिपादन माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार यांनी केले. 

          अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. ते म्हणाले , " शासन अतिशय चांगला उपक्रम राबवत असून शिक्षक परिपत्रकानुसार अंमलबजावणी करत आहेत. शिडवणे गावातील शिक्षकांनी लॉकडाऊन काळातही खूप मेहनत घेऊन शैक्षणिक काम केले आहे. "

          प्रभातफेरीने मेळाव्याची सुरुवात झाली. या प्रभातफेरीमध्ये मान्यवरांनीही सहभाग घेतला. मुलांनी शैक्षणिक घोषणा दिल्या. शाळेतील मुलींनी ' शाळा पूर्व तयारी अभियान गीत ' सादर केले. 

          दीपप्रज्वलन करुन मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र जठार , शिडवणे उपसरपंच अनिल पांचाळ , तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , शेर्पे खारेपाटण केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल , शिक्षणतज्ज्ञ मनोहर कोकाटे ,शाळा व्यवस्थापन सदस्य नीता टक्के , मंजुळा गुंडये , सुप्रिया पाष्टे , मनाली धुमाळ , समिता सुतार , अस्मिता भोवड , शिडवणे कोनेवाडी शाळेचे उपशिक्षक मंगेश खांबाळकर , अंगणवाडी सेविका पाटणकर , मदतनीस केतकर , स्वयंसेवक आर्यन चव्हाण , पूर्वा खानविलकर , अक्षता भोवड , दिप्ती वारिसे , समृद्धी धुमाळ , पहिलीचे विद्यार्थी राहुल वारिसे , कार्तिक सुतार , मयुरी सुतार , त्यांचे पालक आणि शाळेतील सर्व विद्यार्थी , शिक्षणप्रेमी उपस्थित होते. 

          सानिया सुतार , सृष्टी पाष्टे , जान्हवी गुंडये आणि सातवीच्या मुलांनी आपली मनोगते व्यक्त केली. सातवीच्या मुलांना निरोप देण्यात आला. त्यांनी शाळेला भेटवस्तू दिल्या. 

          शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे म्हणाले , " मुलांना शाळेची ओढ वाटायला हवी यासाठी शाळेने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. मुलांनी शारीरिक , बौद्धिक आणि भावनिक दृष्टीने पारंगत व्हावे हा हेतू साध्य करण्यासाठी शिडवणे नं. १ शाळेने उत्तम नियोजन केले आहे. " 

          केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल म्हणाले , " मुलांची शाळेची भीती कमी व्हावी या हेतूने शाळा पूर्व तयारी अभियान शिडवणे नं. १ शाळेने उत्तम राबवले आहे. " 

          जिल्हा परिषद सदस्य रविंद्र जठार यांच्या शुभहस्ते फित कापून स्टॉलचे उदघाटन करण्यात आले. नवीन प्रवेशित मुलांचे पायाचे ठसे घेण्यात आले. विविध उपक्रम घेऊन मुलांचा त्यात सक्रिय सहभाग घेण्यात आला. वजन , उंची घेण्यात आली. सात स्टॉलसाठी शिक्षिका सीमा वरूणकर , सुजाता कुडतरकर यांनी विशेष मेहनत घेतली. प्रवीण कुबल यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी सर्वांचे आभार मानले.





































































No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...