🛑 शिडवणे नं.१ शाळेची शाळा व्यवस्थापन समिती सभा उत्साहात संपन्न
शिडवणे :
खारेपाटण व शेर्पे केंद्रस्तरीय शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व काही सदस्यांचे सक्षमीकरण प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले आहे. त्यामुळे उर्वरित सदस्यांचे प्रशिक्षण घेण्याच्या उद्देशाने शाळा व्यवस्थापन समिती शिडवणे नं.१ ची मासिक सभा घेण्यात आली.
त्यावेळी शाळा व्यवस्थापन समिती रचना , कार्ये , जबाबदाऱ्या व गुणवत्तापूर्ण शिक्षण या विषयांवर शाळेतील पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक तथा सचिव सुनिल तांबे यांनी आपत्ती व्यवस्थापन , सामाजिक अंकेक्षण यांवर मार्गदर्शन केले. पीएफएमएस प्रणाली संदर्भात माहिती देण्यात आली. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आणि झालेल्या खर्चाचा हिशेब सांगण्यात आला.
त्यावेळी अध्यक्ष दिनेश रांबाडे , उपसरपंच अनिल पांचाळ , मनोहर कोकाटे , मंजुळा गुंडये , महेंद्र धुमाळ , प्रिया भोवड , समिता सुतार , शुभांगी गोसावी , नदीम शेख , तारीफ शेख , मंगेश सुतार , सचिन टक्के , प्रवीण कुबल , सृष्टी पाष्टे , आदित्य भोवड आदी उपस्थित होते.सुनिल तांबे यांनी सर्वांचे आभार मानले.
























No comments:
Post a Comment