Thursday, November 28, 2019

शेर्पे केंद्रस्तरीय क्रीडामहोत्सवामधूनच तरेळे प्रभागाचे विजेते घडतात : दिलीप तळेकर

शिडवणे : दिनांक २८ / ११ / २०१९ :
         शिडवणे नं .१ शाळेत शेर्पे केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे उदघाटन मोठ्या दिमाखात संपन्न झाले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना कणकवली पंचायत समितीचे सदस्य दिलीप तळेकर यांनी शिक्षक करीत असलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल गौरवोद्गार काढले. क्रीडास्पर्धेत शेर्पे केंद्राचा सहभाग चॅम्पियनशिप मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले.
         उदघाटक म्हणून शिडवणे गावच्या सरपंच शीतल जाधव  व प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य रविंद्र जठार , शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे, केंद्रप्रमुख ओटवकर  प्रामुख्याने उपस्थित होते.
          केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रांबाडे , क्रीडाप्रमुख गोविंद वावदाने , शिडवणे नं .१ चे मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक सद्गुरू कुबल यांनी केले. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्व मुलांना खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते क्रीडाध्वज फडकवण्यात आला. क्रीडाज्योत प्रज्वलित करून मुलांचे संचलन झाले. त्यानंतर आर्यन चव्हाण या खेळाडूने क्रीडाप्रतिज्ञा सांगितली. मान्यवरांनी श्रीफळ वाढवून सर्व मैदानांचे उदघाटन केले . प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला.
           कार्यक्रमाला परशुराम पाष्टे , अनिल पांचाळ, प्रणाली पाटील , रविंद्र शेट्ये, दिपक पाटणकर, शिवराम जाधव,सुभाष शेलार, विलास पांचाळ, उदय गोसावी, विनोद सुतार, रजनीकांत चव्हाण , रोहिणी शिर्सेकर, विजय पाटणकर , समीर कुडतरकर, बाबा टक्के, शीतल टक्के , बापू गोठणकर , निलेश टक्के, कोकाटे, आरोग्यसेविका बारस्कर  इत्यादी उपस्थित होते. तसेच चिंचवली, कुरंगवणे, बेर्ले , शेर्पे, शिडवणे पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमी , शिक्षकवृंद , विद्यार्थी खेळाडू उपस्थित होते.शिडवणे महिला भगिनींनी भोजन सेवा दिली.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन  शिडवणे नं .१ शाळेचे मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी केले.













































































































































No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...