शनिवार दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी शिडवणे नं. 1 शाळेमध्ये चावडी वाचनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला. तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय अनिल पांचाळ यांच्या घरी हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यावेळी त्यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाला माजी वित्त बांधकाम सभापती रवींद्र जठारसाहेब, सरपंच रवींद्र शेट्येसाहेब, राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी विजय टक्केसाहेब, ग्रामपंचायत सदस्य दयानंद कुडतरकर, सुप्रिया पांचाळ, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल पांचाळ, पोलीसपाटील समीर कुडतरकर, शिक्षणतज्ञ मनोहर कोकाटे, समाजसेवक शिवराम जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुप्रिया पाष्टे मॅडम, उपाध्यक्ष संचिता टक्के मॅडम, तारीफ शेख, अरविंद धाक्रस, मनाली धुमाळ, उर्मिला सुतार, योगेश सुतार, स्नेहा पांचाळ, योगिता सुतार, सत्यवती वारीसे, अंगणवाडी सेविका पाटणकर बाई, अंगणवाडी मदतनीस केतकर बाई, पोषण आहार ताई समिता सुतार मॅडम, सर्व शिक्षक, विद्यार्थी वर्ग व बहुसंख्य पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
चावडी वाचन कार्यक्रमांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व मुलांचे चावडी वाचन घेण्यात आले. 54 पैकी 52 मुलांचे चावडीवाचन कार्यक्रमांमध्ये प्रकट वाचन घेण्यात आले. आपली शाळा निपुण झाल्याबद्दल मुख्याध्यापक कुबल सर यांनी शिडवणे नं. 1 शाळा निपुण झाल्याबद्दल जाहीर केले.
आपली शाळा निपुण शाळा झाल्याबद्दल सर्वांनी शाळेतील मुलांचे व शिक्षकांचे कौतुक केले. इयत्ता पहिली मध्ये एकूण चार मुलांचा प्रवेश गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा अंतर्गत करण्यात आला. सर्व मुलांना मान्यवरांच्या शुभहस्ते पुस्तिका प्रदान करण्यात आली. अनिल पांचाळ यांच्या घराबाहेर शिक्षणाची गुढी उभारण्यात आली. सर्व मुलांचे मान्यवरांच्या शुभहस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले व प्रवेश देण्यात आला.
तंटामुक्ती अध्यक्ष अनिल पांचाळ साहेब यांनी चावडी वाचनासाठी आपल्या घरी सुंदर व्यवस्था केल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांना भेटवस्तू देण्यात आली.
इयत्ता सातवीच्या 2024-25 च्या बॅचचा निरोप समारंभ संपन्न करण्यात आला. त्यावेळी इयत्ता सातवीतील नऊपैकी नऊ मुलांना सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. इयत्ता सातवीच्या बॅच कडून शाळेसाठी चहाची किटली सप्रेम भेट देण्यात आली.
इयत्ता सातवीच्या वर्गातील केतन सुरेश सुतार आणि श्रेया राजेश पाळेकर यांनी निरोप देताना आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्वांचे आभार मानले. आभार प्रदर्शनानंतर सर्व मुलांना पालकांना व उपस्थितांना उसळ पाव अल्पोपहार देण्यात आला. त्यावेळी शाळेतील उपशिक्षक दिपक काळेल सर व सीमा वरुणकर मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञातांचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
त्यावेळी शालेय व्यवस्थापन समितीची सभा सुद्धा घेण्यात आली. सदर सभेमध्ये शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण साहित्य संदर्भातील घडी पत्रिका सर्व सदस्यांना समारंभपूर्वक देण्यात आली.






























































































































No comments:
Post a Comment