🟦 शाळा प्रवेश आनंदोत्सव निमंत्रण
सोमवारपासून म्हणजेच उद्या ४ ऑक्टोबर २०२१ पासून ५ वी ते ७ वी चे वर्ग नेहमीप्रमाणे शालेय वेळेत सुरु होत आहेत.
उद्या सकाळी ठिक १० वाजता मा. रविंद्रजी जठारसाहेब ( जिल्हा परिषद सदस्य ) , मा. शीतल जाधव ( सरपंच ) , मा. अनिल पांचाळ ( उपसरपंच ) , मा. दिनेश रांबाडे ( अध्यक्ष , शाळा व्यवस्थापन समिती ) व उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व मान्यवरांच्या हस्ते शाळेत आलेल्या मुलांचे पुष्प देऊन समारंभपूर्वक स्वागत करण्यात येणार आहे.
तरी या शाळा प्रवेश आनंदोत्सव कार्यक्रमाला विद्यार्थी , पालक , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी वेळीच उपस्थित राहावे ही विनंती. कोविड नियमांचे पालन म्हणजेच मास्क , सॅनिटायझर यांचा वापर अनिवार्य असेल.
उद्या शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेची वेळ १० ते १ अशी तीन तासांची असेल. मंगळवार पासून शाळेची वेळ १०.३० ते १ . ३० अशी असेल. तब्येत निरोगी असलेल्या मुलांनी व पालकांनी शाळेत यावे. तब्येत बरी नसल्यामुळे मुले गैरहजर राहत असलेल्या मुलांच्या पालकांनी वर्गशिक्षक किंवा मुख्याध्यापक तांबेसर यांना फोन करुन कळवावे.
उद्या ५ वी ते ७ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी येणे अपेक्षित आहे. तरीही काही शंका असल्यास 9881471684 या नंबरवर फोन करण्यास विनंती आहे.
🟪 मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १
No comments:
Post a Comment