Monday, October 4, 2021

शिडवणे नं.१ शाळेत शाळा प्रवेश शिक्षणोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

शिडवणे दिनांक : ४ ऑक्टोबर २०२१

          शासनाने ४ ऑक्टोबर पासून इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शाळा सुरु करण्यास परवानगी दिल्याने शिडवणे नं. १ शाळेतील पालकांच्या संमतीने शाळा सुरु करण्यात आली.

          त्यावेळी शाळा प्रवेश शिक्षणोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य तथा माजी वित्त बांधकाम सभापती रविंद्रजी जठार यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. सदर कार्यक्रमाला शेर्पे खारेपाटण केंद्राचे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल , शिडवणे ग्रामपंचायतीच्या सरपंच शीतल जाधव , उपसरपंच अनिल पांचाळ , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रांबाडे , अंगणवाडीताई पाटणकर , शालेय पोषण आहार ताई शुभांगी गोसावी , पालक प्रतिनिधी सचिन टक्के , मुख्याध्यापक सुनिल तांबे , उपशिक्षक प्रवीण कुबल , उपशिक्षिका सुजाता कुडतरकर , उपशिक्षिका सीमा वरुणकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीचे  20 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. कोविड नियमावलीचे पालन करुन कार्यक्रम संपन्न झाला. 

          रविंद्र जठार म्हणाले , " शिडवणे शाळेतील शिक्षकांनी अतिशय चांगल्या प्रकारे अध्यापन केले असून आमच्या विनंतीला मान देऊन अध्यापन सुरू ठेवल्याबद्दल सर्व शिक्षकवृंदाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे." केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल म्हणाले , " मुलांनो , तुम्ही कोणतीही भीती न बाळगता अध्ययन करा व कोविड नियमावलीचे पालन करुन शाळेतील उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. " 

          त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्पे देऊन स्वागत करण्यात आले. सर्व मुलांना रमेश इस्वलकर यांच्या सौजन्याने मास्क देण्यात आले. मोफत पाठ्यपुस्तकांचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दिव्या दिनेश रांबाडे हिला केंद्रप्रमुखांच्या वतीने शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.सरपंच शीतल जाधव यांनी सर्व मुलांना खाऊचे वाटप केले.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल यांनी केले. आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी केले.

































































No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...