Tuesday, May 7, 2019

आमची शिडवणे नं . १ शाळा

     कणकवली तालुक्यातील एक नावाजलेली शाळा म्हणून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ' शिडवणे  नं .१ ' चा उल्लेख केला जातो.
     कणकवली तालुका मुख्य तहसीलपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेली शाळा आपणास नक्कीच आवडेल अशीच आहे.
     खूप जुनी परंपरा कि या शाळेने क्रीडा क्षेत्रात अनेक बक्षिसे मिळवली आहेत. शाळेचे कार्यालय मुलांनी मिळविलेल्या चषकांनी  भरून गेले आहे.
      आज त्या शाळेत हजर होण्याचा माझा पहिला दिवस . शाळा परिसर बघून मी भारावून गेलो. शाळेच्या एकूण तीन इमारती आहेत. रंगमंच तर कार्यालयाच्या समोर अत्यंत चांगल्या प्रकारे बांधलेला दिसून येतो. परिसरामध्ये अंगणवाडीदेखील आहे. शाळेला जिल्हा परिषदेच्या मालकीचे सुंदर आणि विस्तीर्ण असे पटांगण आहे. त्यात मुलांसाठी बालोद्यान उभारलेले आहे. मैदानात झाडांची सावली आहे. असा शाळेचा मोठा परिसर बघून कोणालाही तिथे रेंगाळावेसे वाटेल यात शंका नाही.
     

No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...