🛑 शिडवणे नं. १ शाळेची शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ व सर्वसाधारण पालक सभा संपन्न
शनिवार दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी ' शिडवणे नं. १ ' शाळेच्या सर्व शालेय समित्यांची सभा अध्यक्षा मा. सुप्रिया पाष्टे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
त्यावेळी ग्रामपंचायत सदस्या मा. स्मिता टक्केमॅडम, शिक्षणतज्ज्ञ मा. मनोहर कोकाटेसाहेब, माजी अध्यक्ष मा. दिनेशजी रांबाडेसाहेब, तारीफ शेख, सदाशिव कुडतरकर, नदीम शेख, सचिन सुतार, समिता सुतार, अन्वी येतकर, प्रियांका कासार्डेकर, अरविंद धाक्रस, जान्हवी टक्के, अर्चना पाष्टे, मानसी रांबाडे, योगिता सुतार, आरती टक्के, अंकिता जाधव, मीना वारिसे, कुडतरकर, कांजीर, सीमा वरुणकर इत्यादी उपस्थित होते.
सभेला उपस्थित सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. वनभोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, हळदीकुंकू, स्पर्धा परीक्षा, हर घर संविधान, तालुकास्तर विजेत्यांचे अभिनंदन, होणाऱ्या खर्चास कार्यपूर्व मंजुरी, गणित संबोध परीक्षेतील यशस्वी मुलांचे अभिनंदन, शाळेला शैक्षणिक उठाव देणाऱ्या सर्व देणगीदारांचे आभार, शालेय विशेष दुरुस्ती बद्दल चर्चा, ग्रामपंचायत बालसभेमध्ये मिळालेल्या सूचनांवर चर्चा व उपाययोजना आणि इतर महत्वाच्या शैक्षणिक विषयांवर चर्चा करुन ठराव संमत करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक तथा सचिव प्रवीण कुबल यांनी सर्वांचे आभार मानले. चहापानानंतर सभा संपली.












No comments:
Post a Comment