🛑 स्वच्छता हीच सेवा उपक्रम
🔸शिडवणे नं. १ शाळेच्या स्काऊट आणि गाईडच्या मुलांनी केली मंदिर परिसराची सफाई
शिडवणे :
शिडवणे गावातील मंदिर सफाई करण्याच्या उद्देशाने शिडवणे नं. 1 च्या स्काऊट गाईड पथकाने सफाई मोहीम राबवली.
या सफाई मोहिमेत इयत्ता सातवी व सहावीच्या एकूण 16 मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
मुलांनी मंदिर परिसरात असलेला पालापाचोळा उचलला. झाडू मारली. परिसर स्वच्छ केला. स्वच्छतादूत म्हणून नेहमीच स्वच्छता हाच स्वभाव बनवून मुलांनी आपल्या अंगी स्वच्छतेचे संस्कार अंगी बाणवले आहेत.
स्काऊट मास्तर प्रवीण कुबल आणि गाईड कॅप्टन हेमा वंजारी यांनी मोहिमेचे नेतृत्व केले होते. त्यावेळी मुलांनी मंदिरात गायत्री मंत्र, लक्ष्मी मंत्र, सरस्वती मंत्र आणि गणेश मंत्राचे पठण केले. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्व मुलांना स्काऊट चळवळीची माहिती दिली.






















































No comments:
Post a Comment