Saturday, April 29, 2023

🟣 पालकांनो , जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना शिकवा : रविंद्र जठार

 🟣 पालकांनो , जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना शिकवा : रविंद्र जठार 

🔸शिडवणे नं.१ शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न

शिडवणे : 

          जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मुलांना मोफत पाठ्यपुस्तके , गणवेश , शालेय पोषण आहार अशा विविध शासकीय योजना राबविल्या जातात. मुलांना सर्वांगिण विकासाचे धडे दिले जातात. अनेक सहशालेय उपक्रम राबविले जातात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकवावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य रविंद्र जठार यांनी शिडवणे नं.१ शाळेच्या शाळा पूर्वतयारी मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना केले. 

          शिडवणे नं.१ शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी पहिला मेळावा सकाळी ८ ते ९ यावेळेत आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते शारदामातेचे पूजन करुन व दीपप्रज्वलन करुन मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. 

          शिडवणे ग्रामपंचायतचे उपसरपंच दिपक पाटणकर आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजय टक्के यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. सातवीच्या मुलांना ग्रंथभेट देऊन निरोप देण्यात आला. सेजल एकनाथ भोवड हिने विद्यार्थ्यांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. 

          शाळेच्या वतीने सात शैक्षणिक स्टॉल्स मांडण्यात आले होते. विद्यार्थी वाद्यवृंदानी ढोल ताशांच्या गजरात पहिलीत नवीन येणाऱ्या सहा मुलांचे वाजतगाजत स्वागत केले. मान्यवरांनी नूतन विद्यार्थ्यांना ओळखपत्रे परिधान केली. प्रत्येक स्टॉल वर विविध विकासात्मक उपक्रम घेण्यात आले. 

          मुलांनी आपले शाळेतील पहिले पाऊल टाकताना पुस्तिकांचे वितरण करण्यात आले. पायांचे ठसे घेण्यात आले. मुलांना प्रत्येक स्टॉलवर शैक्षणिक साहित्य दाखवून बोलके करण्यात आले. स्वयंसेविका म्हणून सेजल भोवड , गौरी खानविलकर , सानिका पाष्टे , दिव्या रांबाडे आणि अनुष्का रांबाडे यांची निवड करण्यात आली. 

          शाळा पूर्वतयारी मेळावा पदाधिकारी , शिक्षक , विद्यार्थी आणि पालक यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात संपन्न झाला. सूत्रसंचालन प्रवीण कुबल यांनी केले. आभार सुनिल तांबे यांनी मानले. 

          त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य शांताराम धुमाळ , सुप्रिया पांचाळ , स्मिता टक्के , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ , अनिल पांचाळ , सदाशिव कुडतरकर , प्रवीण पाटणकर , रामचंद्र पाटणकर , सचिन टक्के , पाटणकरबाई , केतकरबाई , शाळेतील शिक्षिका सुजाता कुडतरकर , सीमा वरुणकर , माता पालक श्रद्धा पाळेकर , अर्चना पाष्टे , मानसी रांबाडे , आरती शिंदे , कोमल वारिसे , पहिलीत प्रवेश घेणारी नूतन बालके शर्वरी , सार्थक , तन्मय , आर्या , विधी आणि जान्हवी हे सहा विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित सर्वांना शाळेच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला.

































































































No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...