Friday, December 18, 2020

शिडवणे नं. १ शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन

 शिडवणे : दिनांक १८ डिसेंबर २०२० :

          दर दोन वर्षांनी शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात येते. त्याप्रमाणे शिडवणे शाळा नं. १ येथे पालकांची पालक सभा घेऊन शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. त्यावेळी शाळेतील सर्व पालक, शिक्षक उपस्थित होते. 

            शाळेचे मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. २०१८ - २०२० च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत, आभार आणि अभिनंदन करण्यात आले. दोन वर्षांत केलेल्या सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन शाळेला सहकार्य केल्याबद्दल मुख्याध्यापकांनी प्रशंशोद्गार काढले. 

            सदर सभेमध्ये मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी ' शाळा व्यवस्थापन समितीची रचना आणि कार्ये ' या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रत्येक इयत्तेनुसार शासकीय नियमांनुसार नवीन शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठित केली गेली. त्यानुसार माजी अध्यक्ष दिनेश सहदेव रांबाडे यांची पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षा म्हणून अनिता अशोक कुडतरकर यांची निवड एकमताने करण्यात आली. शिक्षणतज्ज्ञ म्हणून मनोहर  नारायण कोकाटे आणि ग्रामपंचायत प्रतिनिधी म्हणून अनिल रमेश पांचाळ यांची पुनश्च सर्वानुमते निवड करण्यात आली. निता निलेश टक्के, योगेश शिंदे, समिता सुरेश सुतार, सरिता अशोक धुमाळ, प्रिया रामदास भोवड, मंजुळा संतोष गुंडये, प्रेरणा पांडुरंग कासार्डेकर, सुप्रिया योगेश पाष्टे, रामचंद्र सहदेव पाटणकर यांची सर्वानुमते सदस्य म्हणून निवड करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. मनाली महेंद्र धुमाळ यांचीही माता पालक सदस्या म्हणून निवड करण्यात आली.  

                शिक्षक प्रतिनिधी म्हणून शाळेचे पदवीधर शिक्षक प्रवीण अशितोष कुबल व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून शुभम गंगाराम भोवड, सृष्टी योगेश पाष्टे यांची निवड एकमताने करण्यात आली. सचिव सुनिल तांबे यांनी सर्वांचे आभार मानले. कोविड नियमावलीचे पालन करून सभा घेण्यात आली. सभा झाल्यानंतर सर्व पालकांना मुलांचा शालेय पोषण आहार वितरित करण्यात आला. 



















No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...