Wednesday, September 18, 2019

क्रमिक पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करून अध्यापन करा - सद्गुरू कुबल

शिडवणे : दिनांक १८ सप्टेंबर २०१९ :
                शिक्षकांनी शिकवताना नेहमी क्रमिक पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करून मगच वर्गावर अध्यापन करावे असे प्रतिपादन शेर्पे केंद्राचे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांनी शिक्षण परिषदेत केले. शिडवणे नं. १ शाळेत सप्टेंबर महिन्याची शिक्षण परिषद संपन्न झाली. त्यावेळी शेर्पे केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
          इयत्ता २ री च्या मराठी व गणित पाठ्यपुस्तकातील झालेले नवीन बदल शिडवणे नं. १ शाळेतील उपशिक्षिका  सीमा वरुणकर यांनी डिजिटल फलकाचा वापर करून व चर्चा घडवून आणून स्पष्ट केले. त्यानंतर कणकवली सर्व शिक्षा अभियानचे विषयतज्ज्ञ सचिन तांबे यांनी जिल्हा विद्या प्राधिकरणच्या वतीने पीजीआय व ट्विनिंग स्कुल विषयी अतिशय तपशीलवार माहिती दिली. विविध मानसशास्त्रीय खेळांचा वापर करत मार्गदर्शनात रंगत आणली. केंद्रमुख्याध्यापक दशरथ शिंगारे यांनी नवोपक्रम करण्याबद्दल मार्गदर्शन करत सर्व शिक्षकांना आपापल्या शाळेत विविध उपक्रम राबवून त्याचे लिखित स्वरूप करण्याचे आवाहन केले. नवोपक्रम स्पर्धेत भाग घेऊन त्यात आपल्या केंद्राचे नाव शैक्षणिक क्षेत्रात अधिक उठावदार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यास सांगितले. केंद्रप्रमुख कुबल यांनी प्रशासकीय व शैक्षणिक आढावा घेतला. शाळेचे मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी सर्वांचे आभार मानले.















No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...